दोन्ही राष्ट्रवादींचा संसार एकाच छताखाली! हिवाळी अधिवेशनासाठी स्वतंत्र कार्यालयाची मागणी नाही : पुन्हा चर्चा रंगली

सध्या नागपुरात अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात आमदारांना बसण्यासाठी पक्षनिहाय स्वतंत्र कार्यालय दिले जाते.
दोन्ही राष्ट्रवादींचा संसार एकाच छताखाली!
हिवाळी अधिवेशनासाठी स्वतंत्र कार्यालयाची मागणी नाही : पुन्हा चर्चा रंगली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून, शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्ष आणि चिन्हावरून निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांत शिवसेनेप्रमाणे टोकाचा वाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बऱ्याच मुद्यावरून तडजोडी होताना दिसत आहेत. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे. यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीचा टोकाचा वाद असतानाही दोन्ही गटांनी स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली नाही. त्यामुळे या अधिवेशनात दोन्ही गटांसाठी एकच कार्यालय राहणार आहे. या मुद्यावरूनही उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सध्या नागपुरात अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात आमदारांना बसण्यासाठी पक्षनिहाय स्वतंत्र कार्यालय दिले जाते. मागील अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांना स्वतंत्र कक्ष देण्यात आले होते. कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी यावरून मोठा वाद झाला होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा घेतला होता. हा वाद अध्यक्षांपर्यंत गेला. त्यानंतर एकाच कक्षाचे विभाजन करण्यात आले होते. त्यानंतर आपापसात वाद होऊ नये, म्हणून नंतर ठाकरे गटाच्या आमदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. असाच वाद आता राष्ट्रवादीत रंगेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

त्यातच राष्ट्रवादीचे दोन्ही गट स्वतंत्र कार्यालयासाठी दावा करतील, असे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही गटांनीही स्वतंत्र कार्यालयाची मागणी केलेली नाही. त्यामुळे शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एकाच कार्यालयात बसून कामकाज करावे लागणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे एकच कार्यालय राहणार असल्याने दोन्ही गटांतील सदस्यांना एकत्रितच थांबावे लागू शकते. या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस एक असल्याचे तर दाखविण्याचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये तडजोडी होत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पक्ष, चिन्हासाठी टोकाचा वाद

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणाचा, यावरून निवडणूक आयोगात मोठा वाद सुरू आहे. एवढेच नव्हे, तर हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. तसेच आमचीच राष्ट्रवादी खरी असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशा स्थितीत नागपूर अधिवेशनात स्वतंत्र कार्यालय मागितले गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संकटाचे विस्मरण

करून कुटुंबासोबत

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चढ-उतार असतात. वेळप्रसंगी काही संकटांनासुद्धा तोंड द्यावे लागते, पण आयुष्यामधील काही दिवस असे असतात. या सगळ्या संकटाचे विस्मरण करून आनंदाने कुटुंबासमवेत दिवस घालवावे, जगावे, अशा प्रकारची इच्छा असते आणि अशी इच्छा प्रदर्शित करण्याचा दिवस म्हणजे दीपावलीचा दिवस असल्याचे शरद पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in