वरळीचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या केंद्राचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचेल ;आदित्य ठाकरे

वरळीमध्ये जे. के. कपूर चौकाजवळ रायफल रेंज येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन संचलित शूटिंग प्रशिक्षण केंद्र आहे
वरळीचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या केंद्राचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचेल ;आदित्य ठाकरे

वरळी परिसरात रस्ते, उद्याने, विविध पायाभूत सुविधा, शाळा व इतर विकासकामांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास घडून येतो आहे. त्यामध्ये वरळी रायफल शूटिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरणाची भर पडली आहे. १० मीटर रेंज उपलब्ध झाल्यानंतर आता २५ आणि ५० मीटर रेंजदेखील उपलब्ध केली जाणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या केंद्राचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचेल, असा विश्वास राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

वरळीमध्ये जे. के. कपूर चौकाजवळ रायफल रेंज येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन संचलित शूटिंग प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेने नूतनीकरण केलेल्या १० मीटर शूटिंग रेंजचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर संचलित या रायफल रेंजमधील विविध रेंजचे नूतनीकरण गेली काही वर्षे प्रस्तावित होते. १० मीटर रेंजचे नूतनीकरण महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. या रेंजच्या जागेत नव्याने बनविलेले छत, विद्युत प्रकाश योजना यासह रेंजसाठी आवश्यक सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय मानकानुसार केलेल्या आहेत. अंजली भागवत, सुमा शिरुर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी या केंद्रातून धडे गिरवले आहेत. आता २५ आणि ५० मीटर रायफल रेंजचे नूतनीकरण हाती घेणार असून, त्यामुळे वरळी रायफल रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणून नावाजले जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in