अभिनेत्री पूनम धिल्लन यांच्या घरी चोरी

सिनेअभिनेत्री पूनम धिल्लन यांच्या खार येथील फ्लॅटमध्ये चोरी करुन पळून गेलेल्या समीर सलीम अन्सारी या ३७ वर्षांच्या आरोपीस खार पोलिसांनी अटक केली आहे.
पूनम धिल्लन
पूनम धिल्लनएक्स @coolboy4226
Published on

मुंबई : सिनेअभिनेत्री पूनम धिल्लन यांच्या खार येथील फ्लॅटमध्ये चोरी करुन पळून गेलेल्या समीर सलीम अन्सारी या ३७ वर्षांच्या आरोपीस खार पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पूनम धिल्लन या सिनेअभिनेत्री असून त्या जुहू परिसरात राहतात. त्यांचे वांद्रे येथील पाली हिल, पाली माला अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट असून तिथे त्यांचा मुलगा अनमोल हा राहतो. डिसेंबर महिन्यात या फ्लॅटमध्ये पेटींगचे काम सुरू होते. त्यामुळे अनमोल हा दुबईला गेला होता. ५ जानेवारीला तो दुबईहून घरी आला. यावेळी त्याला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. लाकडी कपाटातील हिरेजडीत सोन्याचे एक टॉप, काही कॅश आणि युएस डॉलर चोरी झाले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्याच्यावतीने पूनम धिल्लन यांच्या मॅनेजरने खार पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासात रंगकाम करण्यासाठी तिथे तीन कामगार आले होते. त्यामुळे या तिघांची पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यातील एक समीर अन्सारीने चौकशीदरम्यान ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. आजारी वडिलांच्या उपचारासह मित्रांना पार्टीसाठी त्याने ही चोरी केल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in