जोगेश्‍वरीत व्यावसायिकाच्या घरी दहा लाखांची चोरी

ओशिवरा पोलिसांनी बिहारी नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला
जोगेश्‍वरीत व्यावसायिकाच्या घरी दहा लाखांची चोरी

मुंबई : जोगेश्‍वरीतील एका व्यावसायिकाच्या घरी १० लाखांची चोरी झाली असून याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी विजयकुमार उमेश यादव या बिहारी नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. नवनीत मायाशंकर तिवारी यांचे कुटुंब उत्तर प्रदेशमध्ये तर ते मुंबईत एकटेच राहतात. मे महिन्यांत त्यांच्याकडे विजयकुमार हा नोकरीसाठी आला होता. घरकामासाठी ठेवलेल्या विजयला काहीच येत नसल्याने त्याला दुसरी नोकरी शोधण्यास सांगितले होते. ४ ऑगस्टला गावी जाण्यासाठी कपाटातील पैसे काढत असताना, लॉकरमध्ये १० लाख रुपये नव्हते. घरात दुसरे कुणीही येत नसल्याने तिवारी यांचा विजयवरील संशय बळावला आणि त्यांनी ओशिवरा पोलिसांत त्याच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली. विजय बिहारला त्याच्या गावी गेल्याची शक्यता असल्याने ओशिवरा पोलिसांचे एक पथक बिहारला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in