पोलीस हवालदाराच्या घरातच सव्वातीन लाखांची चोरी

घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
पोलीस हवालदाराच्या घरातच सव्वातीन लाखांची चोरी

मुंबई : ओशिवरा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप कोरवी यांच्या राहत्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरी केला. कुर्ला येथील नेहरुनगर पोलीस वसाहतीत चोरट्यांनी हातसफाई केल्याने स्थानिक पोलीस कुटुंबियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

संदीप कोरवी हे कुर्ला येथील नेहरुनगर पोलीस वसाहतीत पत्नी दिपाली, मुलगी रेवी यांच्यासोबत राहतात. पोलीस हवालदार म्हणून ते ओशिवरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले आणि दुपारी पत्नी व मुलगी नातेवाईकांकडे गेल्या. घरात कुणीही नसल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील चार हजारांची कॅश आणि विविध सोन्याचे दागिने असा ३ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला. रात्री साडेदहा वाजता संदीप कोरवी घरी आले असता, त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती नेहरूनगर पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदाराच्या घरात झालेल्या या घरफोडीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसे आदेशच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in