मुंबई विद्यापीठ निवडणुकीच्या मतदार यादीत घोळ नाहीच ; चौकशी समितीचा अहवाल सादर

शेलार यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा मुंबई विद्यापीठाच्या चौकशी समितीने दिला आहे.
मुंबई विद्यापीठ निवडणुकीच्या मतदार यादीत घोळ नाहीच ; चौकशी समितीचा अहवाल सादर

मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करण्याता आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक समिती गठीत केली होती. त्या समितीने जो अहवाल दिला आहे. त्याने भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मोठा धक्का दिला आहे. शेलार यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा मुंबई विद्यापीठाच्या चौकशी समितीने दिला आहे.

आज अखेर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसंदर्भातील विद्यापीठाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल अखेर सादर करण्यात आला आहे. मतदार यादीतील ७५६ मतदारांची नावे दोन किंवा तीन वेळा दिसत आहे. मात्र तरी देखील त्यातील प्रत्येक व्यक्ती वेगळ्या आहेत. त्यामुळे मतादार यादीत घोळ असल्याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निकाल या समितीने दिला आहे. सिनेट निवडणुकीची मतदार यादी नव्याने तयार करण्याचं काम सुरु करुन लवकरच सुधारित निवडणुकीचा कार्यक्रम जारीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मतदार यादीत कोणत्या मतदाराने मतदान केलं आहे हे कळून येण्यासाठी मतदार यादीत सारखी नावे असलेल्या नावापुढे जो फरक आहे. ते नमुद केला जाणार आहे. उदाहरणार्थ मतदाराचा फोटो वास्तव्याचं टिकाणी यातून हा फरत नमूद होईल, असं समितीकडून अहवालात सांगण्यात आलं आहे. विद्यापीठाने पूर्वी ९४,१६२ मतदारांची अंतिम यादी जाहीर केली होती. आता त्यातील काही अर्ज बाद झाले असून बाद झालेले काही अर्ज स्वीकारले गेले आहेत. त्यामुळे सध्या अंतिम ९० हजार २२४ मतदारांची यादी तयार झाली असल्याचं मुंबई विद्यापीठाने नमूद केलं आहे. त्यामुळे सिनेट निवडणुकीची मतदार यादी नव्याने तयार करण्याची पक्रिया सुरु करणे उचित ठरेल, असं मत समितीने नोंदवलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in