पक्षात गद्दारांना जागा नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पक्षाचे उमेदवार सचिन अहिर व आमाशा पडवी हे उद्या निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
 पक्षात गद्दारांना जागा नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या (सोमवारी) महत्वाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. पक्षात गद्दारांना जागा नाही, तसेच उद्याच्या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पक्षाचे उमेदवार सचिन अहिर व आमाशा पडवी हे उद्या निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘वेस्ट इन’ हॉटेलमधील आमदारांसोबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली. भविष्यात आमदारांसोबत संवाद सुरू राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे हे आमदारांना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटत नसल्याच्या तक्रारी अनेकजण खासगीत करत होते. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख व शिवसैनिकांमध्ये दरी पसरली आहे, अशा स्वरूपाच्या चर्चा माध्यमांमध्ये पसरल्या होत्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in