सिंगापुरच्या धर्तीवर थ्रीडी मॅपिंग सर्वेक्षण होणार

ऑन रेकॉर्ड एखादी इमारत तीन मजली बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे
सिंगापुरच्या धर्तीवर थ्रीडी मॅपिंग सर्वेक्षण होणार

मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना एखाद्या इमारतीला किती मजल्याची परवानगी, किती मजले वाढवले, एका इमारतीत किती फ्लॅट्स आहेत, याची सविस्तर माहिती थ्रीडी मॅपिंगमुळे उपलब्ध होणार आहे. सिंगापुरच्या धर्तीवर थ्रीडी मॅपिंग सर्वेक्षण होणार असल्याचे पालिकेच्या आयटी विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वी मुंबईत टू डी मॅपिंग केले होते. मात्र त्यात कुठलीही सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता थ्रीडी मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑन रेकॉर्ड एखादी इमारत तीन मजली बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात त्यावर आणखी मजले वाढवण्यात आले, एका इमारतीत किती फ्लॅट्स आहेत, किती मजली इमारत आहे, याची माहिती थ्रीडी मॅपिंगमुळे उपलब्ध होणार आहे. मुंबईत झोपडपट्टींची संख्या झपाट्याने वाढत असून प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन सर्वेक्षण करणे रोज शक्य होत नाही. त्यामुळे एखाद्या झोपडपट्टीत गेल्या वर्षी एक मजली झोपडी होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in