येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या शुल्कात मोठी वाढ होणार

राज्यात साधारणपणे ४४ हजार स्कूल बसेस असून महाराष्ट्रात साडेआठ हजार स्कूल बसेस
येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या शुल्कात मोठी वाढ होणार

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे आता पालकांचे मात्र अधिक हाल होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या शुल्कात मोठी वाढ होणार आहे. स्कूल बस असोसिएशनने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यात 15 ते 20 टक्के भाडेवाढ होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरवाढ व अन्य कारणांमुळे स्कूलबस चालक-मालकांना मोठा फटका बसला आहे. इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस ओनर्स असोसिएशनने गेल्या वर्षी स्कूल बसच्या शुल्कात वाढ केली होती. आत, पुन्हा एकदा 1 एप्रिल 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षासाठी स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्कूल बसच्या भाड्यात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे आता पालकांची आर्थिक गणिते कोलमडणार आहेत.

केंद्र सरकारने नवीन भंगार धोरण आखले आहे. स्कूल बस चालकांना याचा फटका बसणार आहे. याशिवाय बसेस, वाहनांचे सुटे भाग, टायर, बॅटरीच्या दरातही 12 ते 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे बसचा एकूण देखभाल खर्च वाढला आहे. यासोबतच दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याने इंधनाच्या दरातही वाढ झाल्याचे असोसिएशनने निदर्शनास आणून दिले आहे.

राज्यात साधारणपणे ४४ हजार स्कूल बसेस असून महाराष्ट्रात साडेआठ हजार स्कूल बसेस आहेत. साधारणपणे 1500 प्रति विद्यार्थी हे सध्या किमान शुल्क आहे. स्कूल बसच्या भाडेवाढीमुळे पालकांचे प्रचंड हाल होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in