एनएससीआय आयोजित स्पर्धेसाठी हे खेळाडु जेतेपदासाठी ठरले दावेदार

एनएससीआय ओपन ही देशातील सर्वात जास्त बक्षीस असलेली स्पर्धा आहे
एनएससीआय आयोजित स्पर्धेसाठी हे खेळाडु जेतेपदासाठी ठरले दावेदार
Published on

नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित अखिल भारतीय स्नूकर खुल्या स्पर्धेला बुधवार १५ जूनपासून सुरुवात होत असून राष्ट्रीय विजेता आणि भारताचा नंबर वन खेळाडू इशप्रीत सिंग चढ्ढा तसेच दुसऱ्या क्रमांकावरील रेल्वेचा मलकीत सिंग हे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.

नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित 2 जुलैपर्यंत चालणार्‍या स्पर्धेत सहा लाख ४० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. एनएससीआय ओपन ही देशातील सर्वात जास्त बक्षीस असलेली स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आकर्षण देशभरातील सर्वच प्रमुख स्नूकरपटूंना असते. यंदा इशप्रीत आणि मलकीत यांच्यासह ब्रिजेश दमानी (पीएसपीबी), कमल चावला (रेल्वे), विजय निचानी (तामिळनाडू), पुष्पेंदर सिंग (रेल्वे), लक्ष्मण रावत आणि अदिल खान यांच्यात (दोघेही पीएसपीबी) जेतेपदासाठी मोठी चुरस आहे. या आठही खेळाडूंना मुख्य फेरीत (मेन ड्रॉ) स्थान देण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे अव्वल दोन स्नूकरपटू क्रीझ गुरबक्षणी आणि महेश जगदाळे यांच्यासह माजी राष्ट्रीय विजेते सारंग श्रॉफ, मनन चंद्रा, रायन राझमी, सौरव कोठारी, एस. श्रीकृष्ण यांनीही मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू पंकज अडवानी आणि माजी राष्ट्रीय विजेता आदित्य मेहता हे अन्य स्पर्धांमध्ये खेळत असल्याने या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.

एनएससीआय स्नूकर ओपन स्पर्धा ही पात्रता (नॉकआउट) आणि मुख्य फेरी अशा दोन गटांमध्ये खेळल्या जाणार्‍या स्पर्धेत 32 अव्वल स्नूकरपटू सहभागी होतील. त्यात राष्ट्रीय क्रमवारीतील टॉप आठ खेळाडूंचा समावेश असेल. क्वॉलिफाइंग राउंड १५ ते २६ जून या कालावधीत होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in