राज्यात सल्लागार समिती स्थापन करण्याचा विचार सुरू

राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी या सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची या कमिटीवर नेमणूक करण्यात येईल.
राज्यात सल्लागार समिती स्थापन करण्याचा विचार सुरू

शिंदे-फडणवीस सरकार एका बाजूला राजकीय लढाई लढत आहे; मात्र दुसऱ्या बाजूला राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नियोजन आयोगाच्या धर्तीवर आता राज्यातही स्टेट ॲडव्हायजरी कमिटी म्हणजे राज्य सल्लागार समिती स्थापन करण्याचा विचार सुरू झाला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आरोग्य, कृषी, शिक्षण या तीन प्रमुख क्षेत्रांवर जास्त लक्ष देण्यात येणार आहे.

राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी या सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची या कमिटीवर नेमणूक करण्यात येईल. धोरण तसेच त्याची अंमलबजावणी, यासाठी ही कमिटी राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे. लवकरच ही कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. राज्यात एका बाजूला राजकीय संघर्ष सुरूच आहे. तो आता न्यायालयातही गेला आहे; मात्र राजकीय लढाई लढत असताना दुसऱ्या बाजूला राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने जी क्षेत्र महत्त्वाची आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्टेट ॲडव्हायजरी कमिटी स्थापन करण्यात येईल. या कमिटीत सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे.

राज्य सरकारला विकासाचे धोरण आखणे, त्याची अंमलबजावणी करणे, यासाठी ही समिती शिफारस करणार आहे. राज्यातील रोजगारवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील जनतेचे उत्पन्न वाढावे, यासाठीही खास लक्ष देण्यात येईल. पायाभूत सुविधांचा विकास जास्तीत जास्त करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. आरोग्य, कृषी आणि शिक्षण क्षेत्रावर जास्त भरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य क्षेत्रावर जास्त लक्ष दिले आहे. रुग्णांवर तातडीने तसेच मोफत उपचार व्हावेत, यासाठी ते खूप आधीपासूनच कार्य करत आहेत. त्यामुळे आरोग्य तसेच कृषी व शिक्षण या तीन प्रमुख क्षेत्रांवर जास्त लक्ष देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. अपूर्ण प्रकल्प मार्गी लावणार, राज्यात किती प्रकल्प अपूर्ण आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे अपूर्ण प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in