मे महिन्यापर्यंत मुंबईकरांची तहान भागली ; पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ८० टक्के पाणीसाठी

मुंबई शहराला मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, विहार, भातसा आणि तुळशी या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो.
मे महिन्यापर्यंत मुंबईकरांची तहान भागली ; पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ८० टक्के पाणीसाठी

मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलावर फुल झाले आहेत. जुलै महिन्यात मुंबईसह राज्याच्या अनेक भागात धुव्वादार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणचे जलाशय ओसंडून वाहू लागले. मुंबईला पाणी पुरवठा करणारे सातही तलाव यामुळे भरले आहेत. मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई शहराला मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, विहार, भातसा आणि तुळशी या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत या सातही जलाशयांमध्ये ८० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठी मुंबईकरांची ३०० दिवस तहान भागवू शकले एवढा आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठी या तलावांमध्ये जमाल झाला आहे. तरीदेखील मुंबईत सुरु असलेली १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुबंई महापालिकेने एक आठवडा पुढे ढकलला आहे.

logo
marathi.freepressjournal.in