तेरा वर्षांपासून वॉण्टेड आरोपीस अटक

अटकेसाठी पोलीस पथक नाशिक, हिंगोली, परभणी, जालना, केरळ राज्यात गेले होते
तेरा वर्षांपासून वॉण्टेड आरोपीस अटक
Published on

मुंबई : पॅरोलवर सुटल्यानंतर तेरा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या अशोक हनुमंता कजेरी या आरोपीस अखेर तेलंगणा येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी धारावी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. अशोक हा गेल्या तेरा वर्षांपासून नाव बदलून तसेच वेशांतर करुन तेलंगणा येथे वास्तव्यास होता , असे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले. २००७ साली धारावी परिसरात झालेल्या हत्येच्या गुन्ह्यांत अशोक कजेरीला धारावी पोलिसांनी अटक केली.

याच गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याला २००८ साली विशेष सेशन कोर्टाने हत्येच्या गुन्ह्यांत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून तो नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता. २०११ साली त्याला तीस दिवसांच्या पॅरोलवर सोडून देण्यात आले होते; मात्र पॅरोलची मुदत संपूनही तो कारागृहात न जाता पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात २२४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. त्याच्या अटकेसाठी पोलीस पथक नाशिक, हिंगोली, परभणी, जालना, केरळ राज्यात गेले होते.

logo
marathi.freepressjournal.in