महापालिकेच्या मुख्य रुग्णालय पैकी एक असलेले केईएम रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण होणार असून, या दिवशी रुग्णालय परिसरात सेंटेनरी भवन १ ही इमारतीच्या पायाभरणीचा सोहळा होणार आहे. पुढील आठवड्यात इमारतीच्या पायाभरणीची प्रक्रिया केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या मुख्य रुग्णालयापैकी एक असलेल्या केईएम रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेतात. १०० वर्ष पूर्ण होणार असल्याकारणाने या इमारतीला सेंटेनरी असे नाव देण्यात येणार आहे. सेंटेनरी १ आणि सेंटेनरी २ अशा दोन इमारती परिसरात बांधल्या जाणार आहेत. पहिल्या इमारतीच्या रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही १२ मजली इमारत असणार असून, या इमारतीत रक्तपेढी शिफ्ट केली जाणार आहे. तसेच, क्लिनिकल आणि प्रयोगशाळा तयार केल्या जातील. यासह, विद्यार्थ्यांसाठीचे ऑडिटोरियम तयार केले जातील.तर भविष्यात सेंटेनरी भवन २ ही इमारत बांधली जाईल. त्याच्यासाठीही प्रस्ताव तयार केला गेला आहे; मात्र, या इमारतीला आणखी बराच काळ जाईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. संगीता रावत यांनी दिली.
२६ मे ला केईएमला १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे, ही सेंटेनरी भवन इमारत बांधली जात आहे. अशा दोन इमारती तयार होतील. यात, प्रयोगशाळा , रक्तपेढी आणि मुलांना बसण्यासाठी ऑडीटोरियम तयार केले जाईल. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या म्हणण्यानुसार मोठे लेक्चर थिएटर असले पाहिजे. २५० पेक्षा जास्त मुले या ऑडीटोरियम मध्ये बसतील अशी व्यवस्था केली जाईल. पहिली इमारत किमान तीन वर्षात तयार होईल.