महाराष्‍ट्र सरकारला मुद्रांक शुल्‍कातुन मिळाला इतका महसूल

आर्थिक वर्ष २२ मध्‍ये महाराष्‍ट्राने मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून एकूण महसूल संकलनात २१ टक्‍के जमा केला
महाराष्‍ट्र सरकारला मुद्रांक शुल्‍कातुन मिळाला इतका महसूल

आर्थिक वर्ष २२ मध्‍ये महाराष्‍ट्र सरकारला मुद्रांक शुल्‍क व नोंदणी शुल्‍कांमधून महसूल संकलन ३५,५९३ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. वार्षिक तुलनात्‍मकदृष्‍ट्या आर्थिक वर्ष २१ मधील २५,४२७ कोटी मिळाले होते. यंदा महसुलात ४० टक्‍क्‍यांच्‍या वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २२ मध्‍ये महाराष्‍ट्राने मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून एकूण महसूल संकलनात २१ टक्‍के जमा केला होता.

मोतीलाल ओस्‍वाल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडच्‍या मते, आर्थिक वर्ष २२ साठी भारतातील २७ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश (जम्‍मू व कश्‍मीर) येथील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क (एसडीअॅण्‍डआरसी) मधून एकत्रित महसूल संकलन १.७१ लाख कोटी नोंदवले गेले. यामध्‍ये आर्थिक वर्ष २१ मधील १.२७ लाख कोटींच्या तुलनेत ३४ टक्‍क्‍यांची वाढ झाली. सरासरी मासिक महसूल संकलन १४,२६२ कोटी इतके वाढले.

महसूल आकडेवारींच्‍या संदर्भात महाराष्‍ट्र एसडी अॅण्‍ड आरसीमधून ३५,५९३ कोटी रुपये सर्वाधिक राज्‍य महसूल संकलनासह सर्वोच्‍चस्‍थानी आहे. राज्‍याने देशाच्‍या एकूण एसडी अॅण्‍ड आरसी महसुलामध्‍ये २१ टक्‍के योगदान दिले. उत्तर प्रदेश एकूण संकलनामध्‍ये १२ टक्‍के योगदान देत 'एसडीअॅण्‍डआरसीं'मधून २०,०४८ कोटी आहे. उत्तर प्रदेशने आर्थिक वर्ष २१ मधील १६,४७५ कोटींच्या तुलनेत महसूलात २२ टक्‍क्‍यांची वाढ झाली. तामिळनाडूने एकूण महसूलामध्‍ये ८ टक्‍के योगदान दिले. तामिळनाडू १४,३३१ कोटी रुपये महसुलासह तिसऱ्या स्‍थानी आहे. राज्‍याने आर्थिक वर्ष २१ मधील ११,६७५ कोटी रुपयांच्या तुलनेत महसूलात २३ टक्‍क्‍यांची वाढ केली. कर्नाटक व तेलंगणा अनुक्रमे १४,०१९ कोटी आणि १२,३७२ कोटी महसूलासह एसडी अॅण्‍ड आरसी तक्‍त्‍यामध्‍ये चौथ्‍या व पाचव्‍या स्‍थानावर आहेत. सरासरी वार्षिक वाढीच्‍या संदर्भात तेलंगणाने १३६ टक्‍क्‍यांची सर्वाधिक सरासरी वाढ केली, त्‍यानंतर ८८ टक्‍क्‍यांसह जम्‍मू व कश्‍मीर, ७८ टक्‍क्‍यांसह सिक्किम, ५१ टक्‍क्‍यांसह नागालँड, ४७ टक्‍क्‍यांसह हरियाणा आणि ४१ टक्‍क्‍यांसह गुजरात यांचा क्रमांक आहे. तेलंगणा, जम्‍मू व कश्‍मीर, सिक्किम, नागालँड, हरियाणा, गुजरात व महाराष्‍ट्राने महसुलात ४० टक्के वाढ नोंदवली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in