ही तर मोदीपर्व संपत आल्याची नांदी; उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून उत्तर देईलच,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केला.
 ही तर मोदीपर्व संपत आल्याची नांदी; उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे, असे म्हणत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागण्याचा प्रयत्न केला. याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर दिले आहे. “बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदीपर्व संपत आल्याची नांदी आणि कबुली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही, हेच एकप्रकारे अधोरेखित केले,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे ही मोदीपर्व संपल्याचीच कबुली आहे. भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की, नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची, असाच हा प्रकार आहे. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून उत्तर देईलच,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत पुढील निवडणुकीत मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा महापौर असेल, असे वक्तव्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवरही हल्लाबोल चढवला.

logo
marathi.freepressjournal.in