यामुळे आता विनयभंगासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करताना उपायुक्तांची परवानगी लागणार

गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास केल्यानंतर यातील बहुतांश गुन्हे बोगस असल्याचे उघडकीस आले होते
यामुळे आता विनयभंगासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करताना उपायुक्तांची परवानगी लागणार
Published on

विनयभंगासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करताना आता प्रत्येक पोलीस ठाण्याला पोलीस उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या कलमांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काही गुन्हे बोगस असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गुरुवारी नवीन आदेश जारी करताना पोलिसांनी संबंधित गुन्हे दाखल करताना विशेष दक्षता घेण्यास सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांत जुन्या भांडणात, प्रॉपटी वाद आणि आर्थिक व्यवहारासह वैयक्तिक कारणावरून विविध पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास केल्यानंतर यातील बहुतांश गुन्हे बोगस असल्याचे उघडकीस आले होते. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची अनेकदा पोलिसांकडून शहानिशा होत नाही. तक्रार आल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदविला जातो. संबंधित आरोपीला अटक केली जाते; मात्र चौकशीत दुसरीच माहिती बाहेर येत असल्याने तो गुन्हा बोगस असल्याचे नंतर पोलिसांच्या निदर्शनास आले होते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

logo
marathi.freepressjournal.in