यंदा दिवाळीचा अपूर्व उत्साह; दादर, लालबाग, फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट फुलले

दादर, लालबाग, फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे
यंदा दिवाळीचा अपूर्व उत्साह; दादर, लालबाग, फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट फुलले

गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे बाजारपेठांमध्ये असलेला निरुत्साह यंदा सर्वांनी झटकून टाकला आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा सर्वच सण, उत्सव जल्लोषात साजरे होत आहेत. त्यातच सणांचा ‘राजा’ असलेला दीपावलीचा सण यंदा बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वारे घेऊन आला आहे. दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढत मुंबईकरांनी यंदा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडवली आहे. त्यामुळे व्यापारीही खूश झाले आहेत. दादर, लालबाग, फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन रस्ते जाम झाले आहेत.

मुंबईत प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोमवारी अभ्यंगस्नान म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस त्यापूर्वी शनिवार, रविवार असे दोन सुट्टीचे दिवस आल्याने बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी तुफान गर्दी केली आहे. शनिवारी दिवाळी खरेदीसाठी मुंबईकरांचे आवडते ठिकाण असलेल्या दादरमध्ये मुंगीलाही चालायला जागा शिल्लक नव्हती.

शनिवारी धनत्रयोदशी असल्याने सराफांच्या दुकानातही सोने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. लालबाग, फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट गर्दीने फुलले होते. खरेदीसाठी लोकांची तोबा गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीने रस्ते जाम झाले होते. करोना महामारी मुळे दोन वर्ष सणांवर निर्बंध होते. मात्र यंदा करोना नियंत्रणात आल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे निबंध मुक्त सण साजरे केले जात आहेत दिवाळीचा चैतन्यमय उत्साह मुंबई ठिकठिकाणी दिसून येत आहे. विविध रंगांच्या रोषणाईने मुंबई जळाळून निघाली आहे. बाजारपेठ ही विविध वस्तूंनी सजल्या आहेत खरेदीसाठी लोकांची झुंबड उडली आहे.

ग्राहकांमुळे बाजारपेठ प्रफुल्लित मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथे मुलांचे का ट्रेंडी कपडे विविध प्रकारची फॅशनेबल जॅकेट, गॉगल्स, बूट, चप्पल, जॅकेट, जीन्स, फॅन्सी ड्रेस, इत्यादी सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच चोर बाजारात जुन्या वस्तू प्राचीन भेटवस्तू आदींच्या खरेदीसाठी शौकिनांनी गर्दी केलेली दिसून आली. जुन्या आणि पुरातन वस्तूंसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे दिवाळीच्या अनुषंगाने विविध वस्तूंची तिथे खास रेल असेल पाहायला मिळत आहे. काळबादेवी परिसरातील लोहार चा येथे शोभेचे दिवे आकर्षक कंदील आणि इतर शोभेचे वस्तू वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी लाईट्स विजेचे दिवे तोरण यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून येथे गर्दी होत आहे धावेरी बाजारात सोने चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी होत आहे. भुलेश्वर काळबादेवी चा परिसर दिवाळीत एक आगळा रंगात रंगून जातो. इमिटेशन ज्वेलरी साठी प्रसिद्ध असणाऱ्या भुलेश्वर च्या मार्केटमध्ये विविध रंगांच्या मोत्यांच्या खड्यांच्या लेस दागिने कपडे पूजा साहित्य देवाधिकांच्या मूर्ती भांडी आधी सर्व काही मिळते भुलेश्वर मंडईत विविध प्रकारचे फळ आणि भाज्या मिळतात तसेच या मंडळीत फुलांची वेगळी मंडळी आहे त्यामुळे येथे फुलांच्या आरसासाठी साहित्य करणाऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

दिवाळी फराळाला मोठी मागणी

वेळेच्या कमतरतेमुळे आजकाल बाहेरून तयार फराळ आणण्याकडे सगळ्यांचा कल असतो. चिवडा हा तर दिवाळीच्या फराळाचा अविभाज्य घटक. विविध प्रकारच्या चिवड्यासाठी लालबागची चिवडा गल्ली प्रसिद्ध आहे. तेथे कायमच मुंबईकरांची गर्दी असते पारंपारिक पोह्याच्या चिवड्यापासून ते मका चिवडा भडंग चिवडा येथे मिळतो. तसेच दिवाळीचा इतर सर्व फराळही इकडे मिळत असल्याने येथे मागील काही दिवसांपासून खरेदीसाठी गर्दी होत आहे.यांना दिवाळी फराळाला चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच मुंबईतील दादर सह अनेक बाजारात आकाश कंदील बहुतांश घरगुती बनवलेले कंदील तसेच कंदीलांबरोबर दिवाळीच्या सजावटीसाठी वेगळ्या प्रकारचे तोरण रंगीबेरंगी आणि आकर्षक अशा पणत्या दिव्याची माळ रांगोळी यादी साहित्यांनी दुकाने फुलून गेली आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर दिवाळीचा माहोल तयार झाला असून बच्चेकंपनी तरी फटाके खरेदीसाठी एक वेगळाच उत्साह टिक ठिकाणी दिसून येत आहे. शोभेचे फटाके आवाज करणारे फटाके खरेदीसाठी बच्चे कंपनीने पालकांकडे तगादा लावल्याने फटाके खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी उसळली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in