यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करता येणार; पालिकेची नवीन नियमावली जाहीर

गेली दोन वर्षे सगळे सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले
 यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करता येणार; पालिकेची नवीन नियमावली जाहीर

दोन वर्षे कोरोनाच्या नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्यात आलेला गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करता येणार आहे. आता घरगुती गणेश मूर्तीच्या उंचींवर मर्यादेचे बंधन नसणार, तसेच गणेश मंडळांकडून आकारण्यात येणारे सगळे शुल्क माफ करण्यात आले असून, मूर्तिकारांच्या मंडपांना लागू असलेले शुल्कही माफ करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट ओढावले आणि गेली दोन वर्षे सगळे सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले; मात्र यंदा कोरोना व टाळेबंदीचे सावट नसल्यामुळे २०२० पूर्वी ज्याप्रमाणे सगळे सण साजरे केले त्याप्रमाणे यंदा सगळे सण धुमधडाक्यात साजरे करता येणार आहेत. लाडक्या बाप्पाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार असून, गणेशभक्तांमध्ये बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.

तसेच गणेश मंडळांना अर्ज करत परवानग्यांसाठी ४ जुलैपासून एक खिडकी योजना सुरू केली होती. तसेच १०० रुपये परवानगी शुल्कही ठेवण्यात आले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेची प्रक्रिया सुरूही झाली होती; मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन सर्व निर्बंध हटवण्याचे व शुल्क माफ करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने आता नवीन नियमावली जाहीर केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in