यंदाचा विद्यार्थ्यांचा १५ ऑगस्ट जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागणार

शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबर विद्यार्थ्यांना खासगी शाळांप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे
 यंदाचा विद्यार्थ्यांचा १५ ऑगस्ट जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागणार

शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळालेला नाही. ८ मार्च रोजी मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राज्य आले असून नुकताच नवीन गणवेश देण्याच्या ८८ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे माप घेऊन शिवणे याला वेळ लागणार असल्याने विद्यार्थ्यांना नवीन गणवेश दिवाळीत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा उदासीन कारभार पुन्हा एकदा समोर आला असून यंदाचा १५ ऑगस्ट विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागणार आहे.

पालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबर विद्यार्थ्यांना खासगी शाळांप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी सीबीएसई आईसीएससी व केंब्रिज बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंसह बेस्ट बसच्या मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांहून चार लाखांवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी खासगी शाळांप्रमाणे शिक्षणासह सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यात २००९ मध्ये असलेला जुना गणवेश १३ वर्षांनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा नवीन गणवेश क्रीम रंगाची पॅन्ट व चॉकलेटी रंगांचा शर्ट असणार आहे. याबाबतच्या ८८ कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी नुकतीच मिळाली आहे. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या उदासीन कारभारामुळे विद्यार्थ्यांना यंदाचा १५ ऑगस्ट जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागणार आहे.

गणवेशाचे कंत्राट दिल्यानंतर पहिली ते १०वीच्या चार लाख विद्यार्थ्यांना दोन जोडी बनवून घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे चार लाख विद्यार्थ्यांसाठी आठ लाख गणवेश बनवावे लागणार असून, यासाठी तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन गणवेश दिवाळीत मिळणार असल्याने १५ ऑगस्ट जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in