अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना, तर मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवेसाठीचा पुरस्कार ए. आर. रेहमान यांना जाहीर करण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई : यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, मुंबई येथे बुधवार, २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना, तर मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवेसाठीचा पुरस्कार ए. आर. रेहमान यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच मोहन वाघ उत्कृष्ट नाट्यनिर्मिती पुरस्कार- गालिब (नाटक), आशा भोसलेपुरस्कृत ‘आनंदमयी’ पुरस्कार - दीपस्तंभ फाऊंडेशन (मनोबल), वाग्विलासिनी प्रदीर्घ साहित्य सेवा पुरस्कार - मंजिरी फडके, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अशोक सराफ, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार - पद्मिनी कोल्हापुरे, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार - रूपकुमार राठोड, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार - भाऊ तोरसेकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अतुल परचुरे, मास्टर दीनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपटनिर्मिती विशेष पुरस्कार - रणदीप हुडा यांना जाहीर करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in