विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांची खैर नाही;मुंबई महापालिकेचा कायदेशीर कारवाईचा इशारा

नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांची खैर नाही;मुंबई महापालिकेचा कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबई शहर तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरे परिसरातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर पूर्वपरवानगीशिवाय होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी सार्वजनिक रस्ते, पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर लावू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

मुंबई महानगरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर काढण्याची मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून सातत्याने राबविली जाते आहे. तसेच संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येते. नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी सार्वजनिक रस्ते, पदपथांवर महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर लावू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात फलकांची यादी नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in