बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर हजारो शिवसैनिकांचे वंदन; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे यांची बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

महाराष्ट्राचे लाडके नेते आणि लाखो शिवसैनिकांचे दैवत हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची रविवार १७ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी. या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील बाळासाहेबांचे प्रेमी आणि शिवसैनिकांनी दादर शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळाला भेट दिली.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर हजारो शिवसैनिकांचे वंदन; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे यांची बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली
Published on

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके नेते आणि लाखो शिवसैनिकांचे दैवत हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची रविवार १७ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी. या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील बाळासाहेबांचे प्रेमी आणि शिवसैनिकांनी दादर शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळाला भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आदींनी स्मृती स्थळावर बाळासाहेबांना वंदन केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पुर्णाकृती पुतळ्याला भेट देऊन आदरांजली वाहिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी मातोश्री निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क मधील जागेत त्यांचे स्मृती स्थळ बनवण्यात आले आहे. या स्मृती स्थळावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह इतर मंत्री, शिवसेना नेते आणि शिवसैनिक व हितचिंतक आदरांजली वाहण्यासाठी येत असतात.

या स्मृतीस्थळाला २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त लाखो चहाते भेट देतात. तर रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त तमाम शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर नतमस्तक होत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

logo
marathi.freepressjournal.in