कर्जाच्या व्याजासाठी बदनामीची धमकी

दोघेही त्यांच्याकडे सतत व्याजासह मुद्दल रक्कमेची मागणी करुन दमदाटी करत होते. त्यांनी दिलेले बँक टाकून चेक बाऊन्सिंगची केस टाकण्याची धमकी देत होते.
कर्जाच्या व्याजासाठी बदनामीची धमकी

मुंबई : कापड व्यापाऱ्याला दिलेल्या कर्जाच्या व्याजासाठी बदनामी धमकी देऊन दमदाठी झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन सावकारी व्यापाऱ्याविरुद्ध नवघर पोलिसांनी भादवीसह महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. समीरभाई राघवजी गाला आणि केशवभाई धारसी गडा अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार कापड व्यापारी असून त्यांचा मुलुंड येथे छेडा ड्रेसेस नावाचे कपड्याचे दुकान आहे. चार वर्षांपूर्वी त्यांची व्यवसायासाठी केशवभाई आणि समीरभाईशी ओळख झाली होती. ते दोघेही व्याजाने पैसे देत असल्याने त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यामुळे या दोघांनी त्यांना दिड टक्के व्याजदराने प्रत्येकी पाच लाख रुपये असे दहा लाख रुपये दिले होते. त्याचे ते दोघांना नियमित व्याज देत होते. जुलै २०२० रोजी त्यांनी केशवभाईकडून आणखीन पाच लाख रुपये व्याजावर घेतले होते. एप्रिल २०२३ रोजी व्यवसायात आलेल्या मंदीमुळे त्यांनी दोघांनाही व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे ते दोघेही त्यांच्याकडे सतत व्याजासह मुद्दल रक्कमेची मागणी करुन दमदाटी करत होते. त्यांनी दिलेले बँक टाकून चेक बाऊन्सिंगची केस टाकण्याची धमकी देत होते.

logo
marathi.freepressjournal.in