अंधेरीतील हॉटेल ललित बॉम्बने उडवण्याची धमकी

वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मुंबई शहरात आत्मघाती हल्ला होणार असल्याचा मेसेज आला होता
अंधेरीतील हॉटेल ललित बॉम्बने उडवण्याची धमकी
Published on

अंधेरी परिसरातील हॉटेल ललित बॉम्बने उडवून देण्याची एका अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली होती. हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून बॉम्ब निकामी करण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मुंबई शहरात आत्मघाती हल्ला होणार असल्याचा मेसेज आला होता. अज्ञात व्यक्तीने २६ मेसेजद्वारे ही धमकी देताना यावेळेस आपण पुन्हा मुंबई शहरात हल्ला करण्यासाठी सज्ज झाल्याचे सांगितले होते. या मेसेजनंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली होती.

ही घटना ताजी असताना अंधेरीतील सहार परिसरात असलेल्या हॉटेल ललितमध्ये सोमवारी सायंकाळी लॅण्डलाइनवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले होते. ते बॉम्ब निकामी करायचे असतील तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकीच या व्यक्तीने दिली होती. या घटनेनंतर हॉटेल प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in