चाकू घेऊन पोलीस शिपायाच्या अंगावर धावून धमकी

अंगावर चाकू घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली
चाकू घेऊन पोलीस शिपायाच्या अंगावर धावून धमकी

मुंबई : दंडाची रक्कम भरल्यास सांगितले म्हणून एका वाहतूक पोलीस शिपायाशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन अंगावर चाकू घेऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नयन विनोद कदम या २१ वर्षांच्या तरुणाला रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करुन पोलीस शिपायाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वैभव दिलीप कुमठेकर हे घाटकोपर पोलीस वसाहतीत राहत असून, सध्या भोईवाडा वाहतूक पोलीस चौकीत पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून, गुरुवारी ते अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. कारवाई सुरू असताना तिथे एका बाईकवरुन एक तरुण जात होता. त्याचे वय कमी असल्याचा संशय येताच त्याला त्यांनी थांबवून लायसन्स मागणी केली. याच कारणावरुन त्याने त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने तिथे असलेल्या भाजी विक्रेत्याकडील चाकू घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in