
मुंबई पोलिसांना धमकीचे कॉल येण्याचं एक सत्रचं सुरु झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांना एक धमकीचा कॉल आला आहे. यात कॉल करणाऱ्या इसामाने स्फोटकांनी भरलेला एक ट्रक मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात आहे. तसंच या टँकरमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक देखील आहे, अशी माहिती दिली आहे. या फोन करणाऱ्या व्य्क्तीने आपली ओळख पांडे अशी सांगितली आहे.
हा कॉल आल्यानंतर तपासयंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. तसंच या कॉल संदर्भात अधिका माहितीमिळवण्याचं काम सुरु असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच मुंबई पोलिसांनी नागिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे.