मुंबई वाहतूक पोलिसांना पाकिस्तानहून धमकीचा मेसेज

मुंबई मे हमला होने वाला है जो २६/११ की याद दिलायेगा असा मेसेज आल्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांना पाकिस्तानहून धमकीचा मेसेज
Twitter

मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी रात्री एक व्हाट्सअँप मॅसेज आला. जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है जो २६/११ की याद दिलायेगा असा मेसेज आल्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. ज्या नंबर वरून हा मेसेज पाठवला आहे तो पाकिस्तानी नंबर असल्याने सांगितले जात आहे.

पाकिस्तानी क्रमांकावरून मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सअॅपवर धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता. त्याचे 'लोकेशन ट्रेस' केले तर तो भारताबाहेर असल्याचे समजले. मुंबईत हल्ला होईल, अशी धमकी संदेशवाहकाने दिली. भारतात ही योजना ६ लोक राबवतील, असेही धमकीच्या संदेशात म्हटले आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारी बोट पकडल्यानंतर दोन दिवसांनी ही धमकी देण्यात आली आहे. २००८ मधील मुंबई हल्ला ही दहशतवादी हल्ल्यांची मालिका होती.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ले झाले होते, ज्यात पाकिस्तानी इस्लामिक दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाच्या १० सदस्यांनी चार दिवसांच्या कालावधीत मुंबईतील १२ ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण मुंबईला हादरा बसला होता. आता ही धमकी आल्याने मुंबई पोलीस सर्व यंत्रणा तयार करून सज्ज आहेत.

जी मुबारक हो मुंबईवर हल्ला होणार आहे, २६/११ की याद होगी, असे म्हणत काही संपर्क शेअर करण्यात आले आहेत. मी पाकिस्तानचा आहे, माझ्यासोबत काही भारतीय आहेत. मेरा ऍड्रेस यहा ट्रॅक होगा पर मुंबई मे सब काम चलेगा. देशाबाहेर लोकेशन ट्रेस केले जाईल, २६/११ चा हल्ला मुंबईत पुन्हा होईल, कदाचित उदयपूरसारखी घटना घडेल. ok याद होगा पंजाब का सिधू मुझसेवाला एस तरह की भी हरकत हो, कुछ भी हो अमेरिका का भी हम ना याद होगा तारीख आपको दू, अगर एक हो सामा ,एक अजमल कसाब एक आई वॉन्ट ऑल जवारी मर गया तो, काफी ऑल जवारी ल भारी है, असे या मेसेज मध्ये लिहिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in