मुलाला जीवे मारण्यासह कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दहशत निर्माण करण्यासाठी त्याने त्याने त्यांना त्यांच्या फॅमिली फोटो पाठवून मुलाच्या फोटोवर लाल रंगाने क्रॉस केले होते.
मुलाला जीवे मारण्यासह कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई : सात लाखांची खंडणीची रक्कम दिली नाहीतर मुलाला जीवे मारण्याची तसेच कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला आली आहे. या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मालाड येथे राहणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करून सात लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिसांत तक्रार केल्यास परिणाम वाईट होतील असे सांगून त्याने त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची तसेच त्यांचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. दहशत निर्माण करण्यासाठी त्याने त्याने त्यांना त्यांच्या फॅमिली फोटो पाठवून मुलाच्या फोटोवर लाल रंगाने क्रॉस केले होते. घाबरलेल्या तक्रारदाराने अखेर मालाड पोलीस ठाण्यात जाऊन खंडणीसाठी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in