वाडीबंदर परिसरात गांजाविक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

वाडीबंदर परिसरात गांजाविक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक
Published on

वाडीबंदर परिसरात गांजाविक्रीसाठी आलेल्या तिघांना आझाद मैदान युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अजिम आतिक सय्यद, राकेश गोरख निमोनकर आणि गणेश प्रकाश गोळेकर अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी १४ लाख ३५ हजार रुपयांचा ७१ किलो ७५५ ग्रॅम गांजाचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर राज्यातून गांजा आणून त्याची मुंबई शहरात विक्री करणारी एक टोळी कार्यरत असून, या टोळीतील काही सदस्य वाडीबंदर परिसरात गांजाविक्रीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने वाडीबंदर येथील पी डिमेलो रोड, अग्निशमन केंद्राजवळील बसस्टॉपजवळ साध्या वेशात पाळत ठेवून अजिम आणि राकेश या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांना दहा किलो गांजाचा साठा सापडला.

चौकशीत त्यांना हा गांजा नाशिक येथे राहणाऱ्या गणेश गोळेकर याने दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने नाशिकच्या सिन्नर येथून गणेशला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर तिथे पोलिसांना ६१ किलो ७५५ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा सापडला.

logo
marathi.freepressjournal.in