
मुंबई : राष्ट्रीय प्राणी असलेल्या पट्टेरी वाघाची कातडीसह नखांची विक्रीसाठी आलेल्या तिघांना एमएचबी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सुरज लक्ष्मण कारंडे, मंजूर मुस्तफा मानकर आणि मोहसीन नजीर जुंद्रे अशी या तिघांची नावे असून, ते तिघेही सातारा येथील महाबळेश्वरचे रहिवाशी आहेत.
त्यांच्याकडून पोलिसांनी काळे-पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले वाघाचे कातडे आणि बारा वाघ नखांचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत १० लाख ६० हजार रुपये इतकी आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. महाबळेश्वर येथून काहीजण वन्य प्राण्याच्या अवयवाची विक्रीसाठी मुंबईतील बोरिवली परिसरात येणार असल्याची माहिती एमएचबी पोलिसांना मिळाली होती.