कांदिवलीतून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक

शुमोन शाहेब सबदर, अब्दुल रहिम मोहम्मद फरकान मुल्ला आणि मोहम्मद उज्जाल नरुल शेख अशी या तिघांची नावे आहेत.
कांदिवलीतून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबई : कांदिवलीतून तीन बांगलादेशी नागरिकांना चारकोप पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली. शुमोन शाहेब सबदर, अब्दुल रहिम मोहम्मद फरकान मुल्ला आणि मोहम्मद उज्जाल नरुल शेख अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती चारकोप पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने सोमवारी सायंकाळी भूमीपार्क रोड, म्हाडा, एकतानगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी सात वाजता तिथे तीन तरुण आले होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ते तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. या तिघांकडून पोलिसांनी तीन मोबाईल जप्त केले आहे. या मोबाईलची पाहणी केल्यानंतर ते त्यांच्या बांगलादेशात राहणाऱ्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in