मुंबई-पुणे महामार्गावर तीन कारचा साखळी अपघात

मुंबई-पुणे कॉरिडॉरच्या कनेक्टिंग लिंक मार्गावरील व्हॅली ब्रिज येथे किलोमीटर ०३/६०० वर बुधवारी सकाळी तीन कारचा साखळी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखात झाली नसून तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर तीन कारचा साखळी अपघात
मुंबई-पुणे महामार्गावर तीन कारचा साखळी अपघात
Published on

पुणे : मुंबई-पुणे कॉरिडॉरच्या कनेक्टिंग लिंक मार्गावरील व्हॅली ब्रिज येथे किलोमीटर ०३/६०० वर बुधवारी सकाळी तीन कारचा साखळी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखात झाली नसून तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

फॉर्च्यूनर, वेरणा आणि एक्सयुव्ही ही वाहने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. यातील फॉर्च्यूनर कार अचानक तिसऱ्या लेनमध्ये थांबल्याने मागून येणाऱ्या वेरणा कारने तिला धडक दिली आणि त्यानंतर वेरणेच्या मागे असलेल्या एक्सयुव्ही गाडीनेही वेरणेला जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला हलवली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र यंत्रणांच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली. महामार्गावर वाहन चालविताना सुरक्षित अंतर राखणे, अचानक ब्रेक न मारणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in