गोरेगाव अपघातात तिघांचा मृत्यू; भरधाव दुचाकी चालविणे जीवावर बेतले

गोरेगाव येथील अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. त्यात राधेश्याम दावंडे, विवेक राजभर आणि रितेश साळवे यांचा समावेश असून ते तिघेही गोरेगावचे रहिवाशी आहेत. भरवेगात दुचाकी चालविणे तिघांच्या जीवावर बेतल्याचे बोलले जाते.
गोरेगाव अपघातात तिघांचा मृत्यू; भरधाव दुचाकी चालविणे जीवावर बेतले
Published on

मुंबई : गोरेगाव येथील अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. त्यात राधेश्याम दावंडे, विवेक राजभर आणि रितेश साळवे यांचा समावेश असून ते तिघेही गोरेगावचे रहिवाशी आहेत. भरवेगात दुचाकी चालविणे तिघांच्या जीवावर बेतल्याचे बोलले जाते.

याप्रकरणी दुचाकीस्वार राधेश्याम दावंडे याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वत:सह इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही तरुण गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात राहत होते. शुक्रवारी रात्री उशिरा ते तिघेही त्यांच्या दुचाकीवरून आरे कॉलनीहून गोरेगावच्या दिशेने जात होते. यावेळी राधेश्याम हा दुचाकी चालवत होता, तर त्याचे दोन्ही मित्र विवेक आणि रितेश मागे बसले होते.

भरवेगात दुचाकी चालविण्याच्या प्रयत्नात त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याने विजेच्या खांब्याला जोरदार धडक दिली होती. या अपघातात ते तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

जखमी तिघांनाही जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी राधेश्याम आणि विवेकला मृत घोषित केले तर रितेशवर तिथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही नंतर मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in