मालाडमध्ये छताचा भाग कोसळून तीन जणांचा मृत्यू, एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू असतानाची दुर्घटना; अन्य तीन जण गंभीर जखमी

मालाड पूर्व येथे बांधकाम सुरू असलेल्या २३ मजली इमारतीच्या २०व्या मजल्यावरील छताचा भाग गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मालाडमध्ये छताचा भाग कोसळून तीन जणांचा मृत्यू, एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू असतानाची दुर्घटना; अन्य तीन जण गंभीर जखमी
Published on

मुंबई : मालाड पूर्व येथे बांधकाम सुरू असलेल्या २३ मजली इमारतीच्या २०व्या मजल्यावरील छताचा भाग गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हाजी बापू रस्त्यावरील गोविंद नगरमध्ये नवजीवन या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. ही इमारत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधली जात आहे. छताचा भाग कोसळून तेथील सहा मजूर यात जखमी झाले. त्यांना मालाडच्या देसाई रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. त्यापैकी तीन जणांचा आधीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. गोपाल बनिका मोदी (३२), सोहन रोथा (२६), विनोद सदार (२६) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गंभीर जखमी झालेल्या जलील शेख, रूपसन मामीन आणि मोहम्मद शेख या तिघांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी मामीन याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. शेख याला कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, वांद्रे पूर्व येथे कॉर्पोरेट इमारतीमधील कायमा हॉटेलच्या वातानुकूलित यंत्रणेचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in