सौदीला बोगस व्हिसावर जाणाऱ्या तीन प्रवाशांना अटक

तीन एजंटने पंजाबच्या एका नामांकित कॉलेजचे मॅकेनिकल डिप्लोमा प्रमाणपत्रे बनवून दिली
सौदीला बोगस व्हिसावर जाणाऱ्या तीन प्रवाशांना अटक

मुंबई : पंजाबच्या एका नामांकित कॉलेजचे बोगस शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधारे एजंटकडून घेतलेल्या वर्क व्हिसावर सौदीला जाणाऱ्या तीन प्रवाशांना सहार पोलिसांनी अटक केली. परमिंदरसिंग राजपाल, कमलजीतसिंग समशेरसिंग आणि रमनकुमार कबलसिंग अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपी मूळचे पंजाबचे रहिवाशी असून, त्यांना सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी जायचे होते. त्यासाठी त्यांना तीन एजंटने पंजाबच्या एका नामांकित कॉलेजचे मॅकेनिकल डिप्लोमा प्रमाणपत्रे बनवून दिली होती.

या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी सौदीला जाण्यासाठी बोगस वर्क व्हिसा मिळविला होता. मंगळवारी पहाटे चार वाजता परमिंदसिंग, कमलजीतसिंग आणि रमनकुमार हे तिघेही सौदी अरेबिया येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांच्याकडील पासपोर्टसह इतर वर्क व्हिसाची शहानिशा केल्यानंतर ते वर्क व्हिसा बोगस असल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in