लोकलच्या धडकेत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुख्य सिग्नल निरीक्षक वासू मित्रा, इलेक्ट्रिकल सिग्नल कर्मचारी सोमनाथ लंबुत्रे व मदतनीस सचिन वानखेडे अशी मृतांची नावे आहेत. प. रेल्वेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
लोकलच्या धडकेत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई : वसईजवळ लोकलने दिलेल्या धडकेत रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मुख्य सिग्नल निरीक्षक वासू मित्रा, इलेक्ट्रिकल सिग्नल कर्मचारी सोमनाथ लंबुत्रे व मदतनीस सचिन वानखेडे अशी मृतांची नावे आहेत. प. रेल्वेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोमवारी रात्री ८.५५ वाजता वसई रोड ते नायगाव दरम्यान ही घटना घडली. ही लोकल चर्चगेटला निघाली होती. सिग्नल पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने हे तीन कर्मचारी ते दुरुस्त करायला गेले होते. तेव्हा ही घटना घडली. प. रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक व वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ प्रत्येकी ५५ हजार रुपयांची मदत देण्यात आली, तर अन्य मदतीची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना १५ दिवसांत दिली जाणार आहे, असे प. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. सोमनाथ लंबुत्रे व सचिन वानखेडे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४० लाख रुपये, तर मित्रा यांच्या कुटुंबीयांना १.२४ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले

logo
marathi.freepressjournal.in