डेंग्यूची लागण झाल्याने तीन संशयीत मृत्यू

साथीच्या आजारांचा अहवाल मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग दर मंगळवारी जाहीर करतो.
डेंग्यूची लागण झाल्याने तीन संशयीत मृत्यू

स्वाईन फ्ल्यू, मलेरिया, लेप्टो, डेंग्यू या साथीच्या आजारांचा मुंबईला घटृ विळखा बसला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या १० दिवसांत डेंग्यूची लागण झाल्याने तीन संशयीतांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र हे तीन मृत्यू नेमके कशामुळे झाले, याचा अहवाल पालिकेची मृत्यू निरीक्षण समिती जाहीर करणार आहे.

साथीच्या आजारांचा अहवाल मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग दर मंगळवारी जाहीर करतो. दर मंगळवारी येणाऱ्या अहवालानुसार, आतापर्यंत २५७ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ३० टक्के म्हणजेच ७३ डेंग्यू रुग्ण हे ऑगस्ट महिन्यात नोंदले गेले आहेत. तर, राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यात २,११७ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद केली आहे. मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. दरम्यान, केंद्र सरकारच्या नियमानुसार डेंग्यूच्या अहवालाची माहिती मृत्यू निरीक्षण समिती अभ्यास करणार आहे.

मृत्यू कशामुळे?

पवई येथील ३७ वर्षीय महिलेचा डेंग्यूमुळे संशयित मृत्यू नोंदवला गेला आहे. तर, एका ५० वर्षीय पुरुष आणि रायगड येथील २७ वर्षीय मातेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पहिले दोन मृत्यू हे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर २७ वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे मृत्यू निरीक्षण समिती याविषयी तपास करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in