चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण

आरडाओरड केल्यानंतर एक व्यक्ती मुलगी शायनासोबत जॉगर्स पार्कमधून बाहेर जाताना दिसला
चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण

मुंबई : चॉकलेटचे आमिष दाखवून एका तीन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पवनकुमार एकदसी गौर या अपहरणकर्त्याला स्थानिक लोकांनी पकडून वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या तावडीतून मुलीची सुटका करण्यात आली असून तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पवनकुमारविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. समीना फारुख अन्सारी वांद्रे येथील धवलगंगा इमारतीच्या जवळच्या जॉगर्स पार्कमध्ये आली होती. तिथे मुलींना खेळण्यासाठी सोडून ती तिच्या कामासाठी निघून गेली होती. सायंकाळी पाच वाजता ती पार्कमध्ये आली होती. यावेळी तिथे तबस्सूम आणि तौसिम या दोन मुली खेळत होत्या. मात्र तीन वर्षांची शायना कुठेच दिसून आली नाही. आरडाओरड केल्यानंतर एक व्यक्ती मुलगी शायनासोबत जॉगर्स पार्कमधून बाहेर जाताना दिसला. उपस्थितांच्या मदतीने पवनकुमारला पकडून मुलीची सुटका केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in