तीन वर्षीय मुलीला बेस्ट बसने चिरडले; चालकाला अटक

मागाठाणे बस आगारातून बोरिवली स्थानक पूर्वेला जाणाऱ्या बेस्ट बसने राजेंद्र नगर येथे तीन वर्षांच्या मुलीला चिरडले. मेहक खातून शेख (३) या मुलीच्या डोक्यावर चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
तीन वर्षीय मुलीला बेस्ट बसने चिरडले; चालकाला अटक
Published on

मुंबई : मागाठाणे बस आगारातून बोरिवली स्थानक पूर्वेला जाणाऱ्या बेस्ट बसने राजेंद्र नगर येथे तीन वर्षांच्या मुलीला चिरडले. मेहक खातून शेख (३) या मुलीच्या डोक्यावर चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. दरम्यान, बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आल्याचे बोरिवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिसांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील डागा ग्रुपची बस नंबर ७४९१ (एमएच ०३- सीव्ही-७४२४ ) मार्ग क्रमांक ए ३०१ ही बस सोमवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास मागाठाणे बस आगारातून बोरिवली पूर्व स्थानक येथे जाण्यासाठी निघाली. विना वाहक ही बस मागाठाणे बस आगारातून निघाली आणि बोरिवली पूर्वेकडील राजेंद्र नगर येथे आली असता मेहक खातून शेख व तिचा लहान भाऊ रस्ता ओलांडताना मेहक खातून शेख ही तीन वर्षिय मुलगी पुढील चाकाच्या खाली आली. या मुलीच्या डोक्यावर चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी मेहक खातून शेख या मुलीला तातडीने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बस चालक प्रकाश दिगंबर कांबळे (४८) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in