सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तीन वर्षांचा कारावास

एका टेम्पोतून कोट्यवधीचा तस्करीचा माल मुंबईत आणला जात असल्याची खबर सीमाशुल्क विभागाला मिळाली होती
सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तीन वर्षांचा कारावास

सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना सत्र न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायधिश ए. ए. सय्यद यांनी एखादा गुन्ह्या दाखल करून नये म्हणून प्रामाणिक सरकारी अधिकार्‍याला पैशाची लालच दाखविणे म्हणजे त्या प्रामाणिक अधिकार्‍यावर गंभीर मानसिक आघात करणारे आहे, असे स्पष्ट करत सीमाशुल्क विभागातील वरिष्ठसत्र अधिकार्‍याला २० लाखांच्या लाचेची ऑफर देणाऱ्या या दोघा आरोपींना तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

एका टेम्पोतून कोट्यवधीचा तस्करीचा माल मुंबईत आणला जात असल्याची खबर सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून चार वर्षांपूर्वी एप्रिल २०१८मध्ये एका टेंपोची झाडझडती घेतली. यावेळी टेंपोतील बहुतांशी मालाची बिले चालकाकडे नसल्याचे आढळून आल्याने मालासह टेम्पो जप्त करण्यात आला.

दरम्यान जप्त केलेला माल आणि टेंम्पो सोडून देण्यासाठी सीमाशुल्क विभागातील तक्रारदार सहायक आयुक्तांना आरोपी हिमांशू अजमेराने २० लाखांच्या लाचेची ऑफर दिली. तसेच कारवाई रोखण्यासाठी वारंवार दबाव टाकला. याची दखल घेऊन सहाय्यक आयुक्तांनी सीबीआयच्या एसीबीकडे तक्रार केली. मग सीबीआयने मानव जगरवाल आणि हिमांशू अजमेरा या दोघांना रंगेहात अटक करून गुन्हा दाखल केला.

logo
marathi.freepressjournal.in