
शुक्रवारी (2 जून) सकाळच्या सुमारास भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात उत्तन पातान बंदर येथील समुद्रकिनाऱ्याव शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत हा मृददेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु केला आहे. आढळून आलेल्या मृतदेहाच्या हातावर त्रिशूल आणि ओमचा टॅटू बनवला असून तरुणीचे वय 25 ते 30 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तन सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महिलेच्या हत्येच कारण काय? पाण्यात वाहून आलेली बॅग नेमकी कुठून आली? हत्या कोणी केली? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. कुणाच्या कुटूंबातील 25 ते 30 वर्षयी महिला मिसिंग असल्यास त्यांना उत्तन सागरी पोलीस ठाण्यास संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.