वाशीत बेस्ट बसच्या अपघाताचा थरार; प्रवासी थोडक्यात बचावले

सीबीडी बेलापूरहून वांद्र्याला जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघाताचा थरार व्हिडीओत कैद झाला आहे.
वाशीत बेस्ट बसच्या अपघाताचा थरार; प्रवासी थोडक्यात बचावले

मुंबई : सीबीडी बेलापूरहून वांद्र्याला जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघाताचा थरार व्हिडीओत कैद झाला आहे. रविवार मध्यरात्री टॅक्सीला धडक देत बसचालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि बस अरेंजा सर्कल येथील डिव्हायडरवर चढली. यावेळी बसमध्ये काही प्रवासी होते, परंतु बस डिव्हायडरवर थांबल्याने प्रवासी थोडक्यात बचावले.

रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सीबीडी बेलापूरहून वांद्रे आगाराकडे जाणारी ५०५ मर्यादित क्रमांकाची वांद्रे आगाराची बस (६६४३) मध्यरात्री १.२० वाजता वाशी येथील अरेंजा सर्कल येथे आली. त्याचवेळेस एक खासगी टॅक्सी (एमएच ४६ बीडी ४८३९) अचानक उजवीकडे वळली. दरम्यान बसचालकाने टॅक्सीला धडक दिली व बसचालकाचे नियंत्रण सुटले. ही बस दुभाजकावर चढली. यावेळी बसमध्ये काही प्रवासी होते. परंतु बस डिव्हायडरवर थांबल्याने प्रवासी थोडक्यात बचावले आणि मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या अपघातात बेस्ट बसचे व टॅक्सीचे मोठे नुकसान झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in