Tiger 3 Box Office Collection:तीन दिवसांत 'टायगर 3' ने केली कोट्यवधींची कमाई; चित्रपटाने प्रेक्षकांवर केली जादू

रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे
Tiger 3 Box Office Collection:तीन दिवसांत 'टायगर 3' ने केली  कोट्यवधींची कमाई; चित्रपटाने प्रेक्षकांवर केली जादू

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'टायगर ३' हा चित्रपट भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. सलमान खानच्या 'टायगर ३' हा चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे .

'टायगर 3' हा चित्रपट १२ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ४४. ५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी ५९ कोटी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४२. ५० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या 'टायगर ३' या चित्रपटाने तब्बल १४६. ०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

'टायगर 3' या चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसांतच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटांत शाहरुख खानचीदेखील एक झलक पाहायला मिळत आहे. इमरान हाशमी या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in