Tiger Shroff Firing : हल्लेखोरांची 'झंगी', 'सिग्नल' ॲप्सद्वारे बातचीत

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराचा कट रचताना आणि हल्ल्याचा समन्वय साधण्यासाठी आरोपींनी ‘झंगी’ आणि ‘सिग्नल’ यांसारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
Tiger Shroff Firing : हल्लेखोरांची 'झंगी', 'सिग्नल' ॲप्सद्वारे बातचीत
Tiger Shroff Firing : हल्लेखोरांची 'झंगी', 'सिग्नल' ॲप्सद्वारे बातचीत
Published on: 

पूनम अपराज/मुंबई

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात हरयाणातून अटक करण्यात आलेले दोन आरोपी - समीर हसन खत्री आणि जटीन कृष्ण पंचाल हे या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार मानल्या गेलेल्या वॉण्टेड आरोपी अनिल पंडित याच्या थेट संपर्कात होते. समीरनेच शूटर रेहान अन्सारी याची ओळख अनिल पंडितशी करून दिली होती आणि त्यानंतरच या गोळीबाराचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा कट रचणारे आणि समन्वयासाठी आरोपींनी 'झंगी' आणि 'सिग्नल' यांसारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्लिकेशन्सचा वापर केल्याचा संशय तपासकर्त्यांना आहे. हल्ल्याची योजना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा अनिल पंडित आणि शूटर रेहान यांच्यामध्ये समीरने संपर्क घडवून आणल्याचा आरोप आहे.

Tiger Shroff Firing : हल्लेखोरांची 'झंगी', 'सिग्नल' ॲप्सद्वारे बातचीत
अनिल पंडित ‘वाँटेड’ घोषित; लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय, चार आरोपींना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (एईसी) गुरुवारी दुपारी या प्रकरणातील सुरुवातीला अटक केलेल्या तिन्ही आरोपींना शूटर रेहान अन्सारी, फूल सिंह आणि ऋतिक महतो यांना मीरा-भाईंदर येथील चेना जंगल परिसरात नेले. तिथे गोळीबाराचा सराव करण्यासाठी वापरलेल्या संशयित ठिकाणाची त्यांनी पाहणी केली. याच्या तपासाचा एक भाग म्हणून ही पाहणी केली आहे तसेच गुन्हे शाखेने चौकशीसाठी एका महिला संशयितालाही ताब्यात घेतले असून तिच्या कथित भूमिकेची चौकशी सुरू आहे.

आणखी तिघांना अटक

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या निवासस्थानाबाहेर १८ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेने आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील एकूण अटकेतील आरोपींची संख्या १० वर पोहोचली आहे. या तिन्ही आरोपींनी हल्ल्याचा कट रचण्यासाठी अभिनेत्याच्या ठिकाणाची रेकी करण्यासाठी आणि शूटरना शस्त्रे पुरवण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. हरयाणामधील रहिवासी असलेले अंकित ऊर्फ सरपंच राजेश खटाक (१८), समीर हसन खत्री (१९) आणि जटीन कृष्ण पंचाल (२७) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in