गणपती विसर्जनासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

दुसरीकडे गणेशोत्सावात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे
गणपती विसर्जनासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

आपल्या लाडक्या गणेशाच्या आगमनानंतर आता शुक्रवारी ९ सप्टेंबरला गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गणपती विसर्जनादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून संपूर्ण शहरात ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पाच हजार सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने मोनेटरिंग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे गणेशोत्सावात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. गणपती विसर्जनासाठी घेतलेल्या वाहनांची तपासणी करा, तसेच वाहनचालकांना शक्यतो गाडी सोडून जाण्यास सांगू नये. त्यासाठी गणेश भक्तांनी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्सावात साजरा होत आहे. त्यामुळे विर्सजनाला कुठेही गालबोट लागू नये, म्हणून पोलीस सज्ज झाले आहेत. गणपतीला आराध्य दैवताचे स्थान असल्याने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सावात साजरा केला जातो. ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती, त्यानंतर दिड, पाच, सात दिवसांच्या गणपतीसह गौरी विसर्जन कुठल्याही विर्घ्नाशिवाय पार पडले होते. गुरुवारी ९ सप्टेंबरला अनंत चर्तुदशी असल्याने मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, क्राईम फ्रन्ट अशा विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आली आहे. अनंत चर्तुदर्शीला आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडतात. या भाविकांना विशेषता महिलांना त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या. छेडछाड करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करा, एकापेक्षा अधिक लैगिंक स्वरुपाचे गुन्हे असलेल्या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

पाच हजार सीसीटिव्ही कॅमेरे

संपूर्ण शहरात पाच हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेतीत वाहने अडकू नये म्हणून प्लेट बसविण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांचे साडेतीन ते चार हजार पोलीस कर्मचारी, सशस्त्र दलाचे जवान, होमगार्ड, वाहतुक रक्षक, जलसुरक्षा दलाचे जवान, नागरीक संरक्षण दलाचे जवान आणि सहा ते साडेसहा हजाराहून स्वयंसेवक वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in