कारस्थानांना कंटाळून मी गुवाहाटीत आलो,उदय सामंत यांचा खुलासा

एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही.
कारस्थानांना कंटाळून मी गुवाहाटीत आलो,उदय सामंत यांचा खुलासा

बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गट गेल्या सात दिवसांपासून गुवाहाटी मुक्कामी आहे. मात्र सुरुवातीला त्यापैकी काही दिवस उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही दोन दिवसांपूर्वी गुवाहाटीची वाट धरत शिंदे गटात सामील झाले. “आपण सध्या एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. मी आजही शिवसेनेतच आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटीत आलो,” असा खुलासा उदय सामंत यांनी केला.

“राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीतदेखील हा उमेदवार निवडून येऊ नये, म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही; गैरसमजाला बळी पडू नका,” असे आवाहनही सामंत यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in