TISD आयोजित ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा २०२४ : उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे, स्थानिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी, नागरिक व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलपमेंटच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.
TISD आयोजित ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा २०२४ : उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

ट्रेनिंग इंस्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलेपमेंट, प्रशिक्षण केंद्राच्या रविवार दि. २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ६५७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलपमेंट, हे प्रशिक्षण केंद्र भांडुप, मुंबई विभागात मागील १३ वर्षांपासून कार्यरत आहे. कोणतेही व्यावसायिक उद्दिष्ट नसलेल्या या केंद्राच्या माध्यमातून भांडुप विभागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या कमकुवत कौटुंबिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कात विविध प्रकारचे उपयोजित आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते.

याच सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून विविध प्रादेशिक अस्मिता, भाषा, धर्म, संस्कृती यात विभागलेल्या खंडप्राय देशातील नागरिकांना भारतीय अशी अभिमानास्पद सामायिक ओळख देऊन एकत्र ठेवणाऱ्या आपल्या संविधानाच्या उद्दिष्टांप्रति जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा मागील पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे.

२०१९ साली पहिल्या वर्षी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकावर आधारित, २०२० साली दुसऱ्या वर्षी संविधानातील मुलभूत हक्क यावर आधारित, २०२१ साली मुलभूत कर्तव्ये यावर आधारित, २०२२ साली राज्य धोरणांची निर्देशक तत्वे यावर आधारित, २०२३ साली भाग ५ संघराज्य, प्रकरण एक कार्यकारी यंत्रणा यावर आधारित तसेच यावर्षी भारताचे संविधान, भाग पाच संघराज्य, प्रकरण दोन संसद यावर आधारित ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा २०२४ राबविण्यात आली.

प्रामुख्याने भारतीय संविधानातील संसदेची रचना, राज्यसभेची रचना, लोकसभेची रचना, संसदेचे सचिवालय, लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यसभेचा सभापती व उपसभापती, संसदीय कामकाज, दोन्ही सभागृहाचे वेतन व भत्ते, सदस्यत्व पात्र व अपात्र, धनविधेयक तसेच बजेट इतर वित्तीय विषयक मार्गदर्शन करणारी कलमे विद्यार्थ्यांना तसेच सर्व सामान्य लोकांना समजावी, संविधानाच्या अंमलबजावणीत लोक सहभाग वाढावा या हेतूने संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले गेले.

स्पर्धकांनी ह्या स्पर्धेकडे फक्त स्पर्धा म्हणून न बघता स्पर्धेच्या उद्देशाकडे आपलं कर्तव्य म्हणून पहावं याकडे आयोजकांनी स्पर्धकांचे लक्ष वेधले. सदर स्पर्धेस मुंबईसह राज्य तसेच देश भरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी स्पर्धेचा आनंद घेत आयोजकांचे कौतुक केले तसेच अशाप्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याची विनंती केली.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांचे हातभार लागले त्या सर्वांचे, स्थानिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी, नागरिक व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलपमेंटच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

काही ठिकाणी मुलांकडे मोबाईल उपलब्ध नसल्याने ही स्पर्धा त्यांच्या विभागात स्वत: योग्य व्यवस्थापन करुन ऑफलाईन घेतली. यामुळे आधुनिक यंत्रणा_तांत्रिक अभाव असतानाही सर्वांना स्पर्धेचा लाभ घेता यावा यासाठी ऑफलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा २०२३ विशेष मेहनत घेत, स्वत: पुढाकार घेऊन पार पाडल्याबद्दल त्यांचे नागरिकांकडून आणि आयोजकांकडून विशेष कौतुक तसेच आभार मानण्यात येत आहे.

सदर स्पर्धेच्या निकालाची तारीख ( RESULT DATE ) लवकरच TISD च्या अधिकृत पेजवर जाहीर करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल व TISD च्या पुढील कार्यक्रम व उपक्रमासाठी TISD च्या अधिकृत पेज ला पुढील लिंक वर जाऊन फॉलो करावे.

https://www.facebook.com/Training-Institute-Of-Skill-Development-102885021799278/

logo
marathi.freepressjournal.in