शिक्षणतज्ज्ञ प्रा. देसाई यांचे निधन

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या माजी संचालिका व देशातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा. अरमाइटी एस. देसाई यांचे निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.
शिक्षणतज्ज्ञ प्रा. देसाई यांचे निधन
Published on

मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या माजी संचालिका व देशातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ प्रा. अरमाइटी एस. देसाई यांचे निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.

१९३४ मध्ये मुंबईत जन्मलेल्या प्रा. देसाई यांनी मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्राचे शिक्षण घेतले आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी संपादन केली. पुढे त्यांनी १९६९ मध्ये अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातून समाजकार्यात पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास नर्मला निकेतन महाविद्यालयात (१९५७- १९८२) प्राध्यापक म्हणून सुरू केला. त्यानंतर TISS मध्ये सामील होत त्यांनी १९८२ ते १९९५ या काळात संस्थेच्या संचालिका म्हणून दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि कणखर नेतृत्वाने काम पाहिले. टीआयएसएसमध्ये आम्ही इमारती नाही, तर माणसे घडवतो, ही त्यांची भूमिका आजही लक्षात राहते. १९९५ मध्ये त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात त्यांनी भारतातील उच्च शिक्षण धोरणांच्या दिशादर्शक सुधारणा आणल्या. घडवून कॉमनवेल्थ सेक्रेटेरिएट तसेच भारत त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघ, सरकारच्या विविध समित्यांशी त्यांनी सक्रियपणे काम केले.

शिक्षण, समाजकार्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार आणि मानद पदव्या प्राप्त झाल्या. शैक्षणिक वारसा, नेतृत्व, समाजकार्याबद्दलची बांधिलकी पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in