यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी सबवे पाण्यात

अंधेरी सबवेत पावसाळ्यात वरून एका सेकंदात मोठ्या वेगाने एक हजार लिटर पाणी खाली येते. मात्र अंधेरी सबवे खाली असलेल्या पाईपलाईनची पाणी वाहून नेण्याची क्षमता १८ क्यूबिक लिटर इतकी आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी सबवे पाण्यात

मुंबई : पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये, यासाठी मोगरा नाल्याशेजारी आणखी एक नाला बांधण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक असून या प्रक्रियेस वेळ लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी सबवे पाण्याखाली असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पावसाचे पाणी सबवेमध्ये साचल्याने तब्बल २१ वेळा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसताच सखल भागात पाणी साचते. अंधेरी सबवेही अनेकदा पावसामुळे पाण्याखाली जातो आणि वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. अंधेरी सबवेत पावसाळ्यात वरून एका सेकंदात मोठ्या वेगाने एक हजार लिटर पाणी खाली येते. मात्र अंधेरी सबवे खाली असलेल्या पाईपलाईनची पाणी वाहून नेण्याची क्षमता १८ क्यूबिक लिटर इतकी आहे. त्यामुळे मोगरा नाल्याशेजारी आणखी एक नाला बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

... तर सब वे बंद

दरम्यान, मोगरा नाल्याशेजारी आणखी एक नाला बांधणे, यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी सबवे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने याठिकाणी पोलीस, पालिकेचे अधिकारी तैनात असतील आणि सब वेत पाणी शिरले तर बंद करतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in